संसदेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब

0
2

कालपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. लोकसभेत ‘अदानी’ मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. तसेच राज्यसभेतही विरोधकांनी ‘अदानी’ मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याशिवाय राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात वादावादी झाली. परिणामी बुधवार दि, 27 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. खर्गे यांनी राज्यसभेत अदानीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना रोखले. या मुद्द्यावर तुम्ही जे काही बोलता ते रेकॉर्ड केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.