दहावी, बारावी परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

0
9

बारावीची 1 फेब्रुवारीपासून, तर दहावीची 1 मार्चपासून

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जारी केले असून, बारावीची परीक्षा 1 फेब्रुवारी 2025 पासून आणि दहावीची परीक्षा 1 मार्च 2025 पासून घेण्याचे जाहीर केले आहे.

गोवा शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रकाची माहिती सर्व विद्यालयांना परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. गोवा शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा दरवर्षी एप्रिल महिन्यात घेतली जात होती; तथापि यावर्षी दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीची लेखी परीक्षा 1 मार्चपासून घेतली जाणार आहे, तर प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेचे शुल्क सुध्दा ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहे. दहावीची परीक्षा 31 केंद्रातून घेतली जाणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 8 जानेवारीत घेतली जाणार आहे. परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा 20 केंद्रातून घेतली जाणार आहे.