पंचायत पोटनिवडणुकीत 79.90 टक्के मतदान

0
14

राज्यातील दहा ग्रामपंचायतीच्या दहा प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी काल 79.90 टक्के मतदान झाले. मतमोजणी आज सोमवार 24 रोजी सकाळी 8 वाजता तालुका मामलेदार कार्यालयात केली जाणार आहे.

सुकूर पंचायत प्रभाग 10 मध्ये 73.23 टक्के, कुडणे पंचायत प्रभाग 2 मध्ये 95.06 टक्के, वळवई पंचायत प्रभाग 2 मध्ये 93.98 टक्के, केरी पंचायत प्रभाग 3 मध्ये 74.86 टक्के, कुंडई पंचायत प्रभाग 7 मध्ये 89.53 टक्के, बोरी पंचायत प्रभाग 11 मध्ये 83.23 टक्के, राशोल पंचायत प्रभाग 5 मध्ये 77.97 टक्के, सेरावली पंचायत प्रभाग 2 मध्ये 70.57 टक्के, असोळणा पंचायत प्रभाग 1 मध्ये 60.87 टक्के आणि शेल्डे पंचायत प्रभाग 2 मध्ये 85.09 टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काल 52.12 टक्के मतदान काल झाले. या पोट निवडणुकीत चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मतमोजणी सोमवार 24 रोजी सकाळी 8 वाजता मडगाव येथे करण्यात येणार आहे.

फोंडा तालुक्यात मतदानास प्रतिसाद

फोंडा तालुक्यातील 4 पंचायतींमधील प्रभागात पोटनिवडणुकीत मतदारांकडून उत्तम मतदान झाले. या मतदानावेळी कोणताच अनिसूचित प्रकार घडला नाही. दिवसभरात वळवई पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये 93.98 टक्के, कुंडई पंचायतीच्या प्रभाग 7 मध्ये 89.53 टक्के, बोरी पंचायतीच्या प्रभाग 11 मध्ये 83.28 तर केरी पंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये 74.86 टक्के कमी मतदानाची नोंद झाली. केरी पंचायत क्षेत्रातील प्रभाग 3 मधून प्रदीप पुरुषोत्तम जल्मी, रामकृष्ण बाबुसो जल्मी व विशांत शंबा केरकर तर कुंडई पंचायत क्षेत्रातील प्रभाग 7 मधून प्रियांका पुंडलिक गावडे, राजेश्री मोनू गावडे, राजवी रवीकांत गावडे व संजना सुदेश नाईक, बोरी पंचायत क्षेत्रातील प्रभाग 11 मधून दत्तेश रमेश नाईक, नूतन संतोष नाईक व शिवानंद तुळशीदास गावकर, वळवई पंचायत क्षेत्रातील प्रभाग 2 मधून अंकिता अंकुश नाईक व सर्वेश रामनाथ नाईक यांच्यात थेट लढत झाली आहे.