बेधडकपणे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल अल्पवयीन मुलाला न्यायालयाने येरवडा वाहतूक विभागातील वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्याचा आदेश दिला आहे. तसेच याप्रकरणात वाहतूक जागृतीबाबतचे फलक रंगवावे, अपघातावर त्याने 300 शब्दांचा निबंध लिहावा, या अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलाने जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर बाल न्यायमंडळात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुलाचा जामीन अर्ज मंजूर केला.
भरधाव वेगाने येणाऱ्या अल्पवयीन कारचालकाने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने आयटी अभियंता अनिष अवधिया (24) व अश्विनी कोस्टा (24) यांचा मृत्यू झाला. ही घटना येरवडा परिसरातील रविवारी दि. 19 रोजी घडली. या प्रकरणात आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.