‘आप’च्या निवडणूक प्रचार गीतात बदल करण्याची सूचना

0
14

निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला निवडणूक प्रचार गीतात बदल करण्याची सूचना केली आहे. आपला गाण्यात बदल करून ते पुन्हा सबमिट करण्यास सांगितले आहे. गाण्याला तपासूनच प्रमाणपत्र दिले जाईल असे आयोगाने म्हटले आहे. या गाण्याच्या ‘जेल के जवाब में हम वोट देंगे’ या ओळीत संतप्त जमाव दिसत आहे. या जमावाच्या हातात अरविंद केजरीवालांचे तुरुंगात असलेले चित्र आहे. अशा चित्रीकरणामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन होते. तसेच या ओळीची अनेक वेळा पुनरावृत्ती झाली आहे, जी केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 अंतर्गत कार्यक्रम आणि जाहिरात संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमाचे उल्लंघन करते. याबाबत बोलताना आम आदमी पक्षाचे नेते आतिशी यांनी पत्रकार परिषदेत जर भाजपने आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.