दूधसागर धबधब्यावर बेपत्ता पर्यटकाचा मृतदेह सापडला

0
12

गुरुवारी दुपारपासून दूधसागर धबधब्यावरून बेपत्ता झालेला बेंगळुरू येथील अब्दुल रफीक यांचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. कुळे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवून दिला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार गुरुवारी दुपारी अब्दुल रफीक हा पर्यटक अचानक दूधसागर धबधब्याजवळून बेपत्ता झाला होता. त्यानंतर कुळे पोलीस व वन खात्याचे कर्मचारी बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा शोध घेत होते. रविवारी दुपारी धबधब्याच्या परिसरातील जंगलात एका दगडाच्या खाली पडलेल्या स्थितीत अब्दुल या पर्यटकाचा मृतदेह आढळून आला. कुळे पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवला. सोमवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.