उत्तराखंड सरकारने मंगळवारी विधानसभेत समान नागरी कायद्याबाबतचे (यूसीसी) विधेयक सादर केले होते. हे विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत काल मंजूर करण्यात आले. विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर केल्याने उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य बनले आहे. समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने उत्तराखंडच्या नागरिकांना यूसीसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याच आश्वासनाची अंमलबजावणी झाली आहे