म्हादईप्रश्नी ‘तारीख पे तारीख’

0
12

>> सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा टळली

सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलतंटा प्रश्नी याचिकेवर काल सुनावणी झालीच नाही. आता, गुरुवार दि. 7 डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलतंटा प्रश्नी बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र काल सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सुनावणीला आलीच नाही.

म्हादई जलतंटा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गोवा, कर्नाटक या राज्याच्या वेगवेगळ्या याचिका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील महिन्यात 29 आणि 30 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलतंटा याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता होती. त्यासाठी गोव्याच्या वकिलांचे पथक नवी दिल्लीला गेले होते; मात्र या दोन्ही दिवशी याचिका सुनावणीला आली नाही. त्यानंतर काल म्हादई याचिकेवर सुनावणीची शक्यता व्यक्त होती; मात्र काहीच घडले नाही. आता, गुरुवार 7 डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात सर्वोच्च न्यायालयातील म्हादई जलतंटा सुनावणीचा विषय चर्चेचा बनला आहे. न्यायालयात म्हादई जलतंटा याचिकेवर कधी सुनावणी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.