जमीन हडप प्रकरणी तिघा संशयितांना पुन्हा अटक

0
8

गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) जमीन हडप प्रकरणातील एक सूत्रधार मोहम्मद सुहेल ऊर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह आणखी दोन संशयित आरोपी रॉयसन रॉड्रिग्स आणि स्टीव्हन डिसोझा यांना काल पुन्हा अटक केली.
राज्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणांचा तपास करणाऱ्या एसआयटीने सूत्रधर मोहम्मद सुहेल याला यापूर्वी अनेकदा अटक करून त्याची जामिनावर सुटका झाली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या जमीन घोटाळा प्रकरणी कोट्यवधींची मालमत्ता तात्पुरती जप्त करून कारवाई सुरू केली आहे. मोहम्मद सुहेल याच्या ताब्यातील काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या खात्यातील जुन्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमीन बळकावण्यात आलेली आहे. या प्रकरणी मामलेदारासह सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या एक सदस्यीय चौकशी आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.