म्हादईप्रश्नी आज सुनावणी शक्य

0
29

सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील महत्त्वपूर्ण अशा म्हादईप्रश्नी याचिकांवर सुनावणी काल होऊ शकली नाही. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी याचिकेवर सुनावणीसाठी बुधवार 29 नोव्हेंबर आणि गुरुवार 30 नोव्हेंबर अशा दोन तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यातील बुधवारी ही याचिका सुनावणीला येऊ शकली नाही. आता, गुरुवारी म्हादई प्रश्नी सुनावणीला येईल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. नवी दिल्ली येथे गोव्याच्या वकिलांची टीम म्हादई याचिकांवरील सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. म्हादईप्रश्नी याचिकेवरील युक्तिवादासाठी आमची पूर्ण तयारी आहे. याचिका सुनावणीला आल्यास वकील युक्तिवाद करतील, असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी वेगवेगळ्या पाच याचिका आहेत. त्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.