वीज खात्याच्या लाईन हेल्परच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला असून, या प्रकरणाला जबाबदार असलेल्या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली. शिवोली येथे गुरुवारी वीज खात्याचा लाईन हेल्पर कृष्णा पवार याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता.
या प्रकरणी त्या विभागातील कनिष्ठ अभियंता, लाईनमन, साहाय्यक लाईनमन व इतरांच्या चौकशीची सूचना करण्यात आली आहे. घटनेच्या ठिकाणी उपस्थित कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांच्या विरोधात कारवाईची सूचना केली आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
कृष्णा पवार याच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, त्या कुटुंबाला खात्याकडून भरपाई देखील दिली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले.