दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी आकस्मिक मृत्यू

0
4

पासल-पैंगीण येथील लक्ष्मीकांत नाईक (46) आणि शशिकांत नाईक (40) या दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी आकस्मिक मृत्यू होण्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे सदर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या दोन्ही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून, मृत्यूचे नेमके कारण शवचिकित्सा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

रविवारी रात्री 10 च्या दरम्यान अकस्मात शशिकांत नाईक हे जमिनीवर कोसळले, त्यांना सावरण्यासाठी लक्ष्मीकांत नाईक हे धावले आणि त्यांनी शशिकांत यांना उचलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी लक्ष्मीकांत हे देखील खाली कोसळले आणि गतप्राण झाले. या दुर्दैवी घटनेनंतर पैंगीण पंचक्रोशीतील लोकांनी या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गर्दी केली होती.