आणखी एका लोकप्रतिनिधीचे ओबीसी प्रमाणपत्र ठरले अवैध

0
27

गोवा खंडपीठाने जिल्हा पंचायत सदस्य हॅन्झेल फर्नांडिस यांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले ओबीसी प्रमाणपत्र अवैध आणि रद्दबातल ठरविले आहे. फर्नांडिस यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. फर्नांडिस यांना दिलेली ओबीसी प्रवर्गातील जात प्रमाणपत्रे अवैध आणि रद्दबातल केली आहे. राज्य ओबीसी यादीत ख्रिश्चन मेस्ता अद्याप समाविष्ट नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशातून निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान, फर्नांडिस यांनी या आदेशाला सहा आठवड्यांच्या कालावधीसाठी स्थगिती देण्याची केलेली विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.