मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पणजी दूरदर्शन केंद्रावरील ‘हॅलो गोंयकार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा पणजी दूरदर्शन केंद्रावरील हॅलो गोंयकारचा पहिला कार्यक्रम शुक्रवार दि. 2 जून रोजी संध्याकाळी 7 ते 8 यावेळेत होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना प्रश्न विचारण्यासाठी नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक 0832-2222424 किंवा 2225204 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.