एनसीहबीने भर समुद्रात केले 15 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

0
5

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) भारतीय सागरी हद्दीत सुमारे 15,000 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. एनसीबी व भारतीय नौदलाने हिंदी महासागरात एक मोहीम राबवली. त्यात ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्रोत पाकिस्तान आहे. हे अमली पदार्थ इराणच्या चाबहार बंदरातून आले होते. एनसीबीने शनिवारी एका विशेष कारवाईत केरळच्या कोची किनारपट्टीवरून 12,000 कोटी रुपयांचे 2,500 किलो ड्रग्ज जप्त केले होते. मदर शिप समुद्रात अनेक ठिकाणी तैनात करण्यात आले होते. वेगवेगळ्या देशांच्या छोट्या बोटी मदर शिपपर्यंत पोहोचायच्या आणि तेथून ड्रग्ज आपापल्या देशात नेत होत्या. या कारवाईत एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.