मांद्रे, मोरजीतील 32 शॅक्स बंद

0
11

मांद्रे आणि मोरजी येथील कासव संर्वधन क्षेत्रातील गोवा प्रदूषण मंडळाची मान्यता नसलेले 32 शॅक्स काल बंद करण्यात आले. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने केलेल्या पाहणीत सदर 32 शॅक्स मान्यता न घेताच सुरू केल्याचे आढळून आले होते. मंडळाने सदर 32 शॅक्स बंद करण्याचा आदेश जारी केला होता.