राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून मागील ६ महिन्यांपासून रेशन धान्य न उचललेल्या रेशन कार्डधारकांची रेशन कार्ड येत्या १ फेब्रुवारी २०२३ पासून तात्पुरती निलंबित करण्यात येणार आहेत.
नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने याबाबतची जाहीर सूचना काल जारी केली. ज्या लाभार्थींची रेशन कार्ड निलंबित करण्यात येतील. त्यांनी कार्डाचे निलंबन उठवण्यासाठी अन्न धान्य कोट्याचा लाभ न घेतल्याच्या वैध कारणासह अर्ज तालुका नागरी पुरवठा कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे.