सण काळात रात्री १२ नंतर ध्वनिक्षेपक वापरावर बंदी

0
7

राज्य सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल खात्याने सण, उत्सवाच्या काळात रात्री १२ वाजल्यानंतर संगीतासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. खात्याने सण, उत्सवात ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत यापूर्वी जारी केलेल्या सूचनेत दुरुस्ती केली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापराची तरतूद रद्द केली आहे. इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत आणि सण-उत्सवांच्या १५ दिवसांत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास मान्यता दिली आहे.