माशे – दापट काणकोणात पुतण्याकडून काकाचा खून

0
17

माशे दापट येथे काका व पुतण्या यांच्यामध्ये झालेला वादात पुतण्याने काकावर सुरी हल्ला केला. या घटनेत काकाचा मृत्यू झाला. ही घटना काल रविवार दि. २० रोजी सकाळी ७.२०च्या दरम्यान घडली अशी माहिती काणकोण पोलिसांनी दिली.
या घटनेतील जानू खरात (४८) हे काका व अजय खरात (२७) हा पुतण्या यांच्यामध्ये रविवारी सकाळी बाचाबाची झाली. दोघांच्याही भांडणात अजय खरात यांनी काका जानू यांच्या अंगावर चाकूने वार केले त्यात जानू यांचा मृत्यू झाला.

अजय खरात याला काणकोण पोलिसांनी अटक केली आहे तर जानू खरात यांचा मृतदेह मडगावच्या जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीकरता पाठवला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक करीत आहेत.
अजय खरात हा विदेशी जहाजावर नोकरीला होता व तो विश्रांतीकरिता काही दिवसांपूर्वीच दापट येथील घरी आला होता. अजयला आई व बहीण असा परिवार असून जानू खरात याला आई, मुलगे असा परिवार आहे.