राज्यात यंदा ऑक्टोबरपर्यंत रस्ता अपघातात २१७ बळी

0
18

राज्यात वर्ष २०२२ च्या पहिल्या १० महिन्यांत रस्ते अपघातात २१७ जणांचे बळी गेले आहेत.
१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत गोव्यात २१७ अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्य वाहतूक कक्षाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत ही एकत्रित संख्या १६६ होती.

ऑक्टोबर २०२२ या एकाच महिन्यामध्ये रस्ता अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर २०२१ च्या तुलनेत जवळपास ११ अधिक आहे. तेव्हा अपघाती मृत्यूची संख्या १२ होती.
तथापि २०२१ आणि २०२२ मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एकूण अपघातांची संख्या जवळपास सारखीच म्हणजे अनुक्रमे २५२ आणि २५१ अशी आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये मृत्यू झालेल्या २३ मध्ये १६ दुचाकीस्वार आणि ४ पादचार्‍यांचा समावेश आहे.