नव्या मोप विमानतळाचे उद्घाटन ११ डिसेंबरला शक्य

0
22

मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तथापि, पंतप्रधान कार्यालयाने विमानतळाच्या उद्घाटनाची औपचारिक तारीख कळविलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोवा सरकार, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि जीएमआर कंपनी यांनी मोप विमानतळाच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून नरेंद्र मोदी यांच्या उपलब्धतेनुसार उद्घाटनाची तारीख निश्‍चित केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.पणजीत येत्या ८ ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान कला अकादमीच्या आवारात ९ वी जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस आणि आरोग्य एक्सपो होणार आहे. या आयुर्वेद कॉंग्रेसमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.