सोनाली फोगट प्रकरणाचा पर्यटन उद्योगाशी संबंध नाही ः रोहन खंवटे

0
8

भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्याप्रकरणाचा संबंध हा पर्यटन उद्योगाशी जोडला जाता कामा नये. फोगट यांचा जो खून झाला त्याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. हा तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य काय ते उघड होणार असल्याचे काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.
किनारपट्टी भागातील अमली पदार्थांच्या विरोधात सरकारने मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी यावेळी दिली.

गोव्यात जेव्हा जेव्हा एखादी गुन्हेगारी घटना घडते तेव्हा त्या घटनेचा पर्यटन उद्योगाशी संबंध जोडला जातो. हे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आम्हाला गोव्यात येऊन जबाबदारपणे वागून मौजमजा करून जाणारे पर्यटक हवे आहेत. राज्याच्या पर्यटनाची गाडी योग्य दिशेने जावी अशी आमची इच्छा असल्याचे खंवटे म्हणाले.