बायंगिणी कचरा प्रकल्पासाठी २ महिन्यांत निविदा : मोन्सेरात

0
32

बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी येत्या २ महिन्यांत निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती काल कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल दिली.

या कचरा प्रक्रिया प्रकल्पासंबंधीची एक याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहे; मात्र न्यायालयाने या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थगिती आणलेली नाही, असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी सरकारला कायदेशीर परवानगी, तसेच अन्य सर्व आवश्यक ते परवाने मिळाले असल्याचेही मोन्सेरात यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर बायंगिणी कचरा प्रकल्पासाठी येत्या २ महिन्यांत निविदा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.