>> वाघेरी डोंगर कापणी प्रकरण
वाघेरी येथील डोंगर कापणीप्रकरणी आता चक्रे वेगाने फिरू लागलेली असून, वाघेरीच्या ज्या जमीनमालकांनी बेकायदेशीरित्या आपली जमीन विकली आहे, त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावे, असा आदेश काल वन आणि नगर-नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.
या प्रकरणी केरी वन परिक्षेत्र अधिकार्याला (आरएफओ) सोमवारीच निलंबित केले आहे. या प्रकरणी तात्कालीन उप वनसंरक्षकांची चूक असल्याचे आढळून आल्यास त्यांनाही निलंबित करण्यात येणार आहे. या प्रकरणी उप वनसंरक्षकांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे.