करासवाडा-म्हापशात वादातून गोळीबार

0
16

करासवाडा-म्हापसा येथे एका कारला दुचाकीची धडक बसल्याने त्यातून निर्माण झालेल्या वादात मंगळवारी सकाळी गोळीबार करण्याचा प्रकार घडला. ही घटना करासवाडा येथील पेट्रोल पंपच्या परिसरात घडली. येथील महामार्गावरून आतील भागात रस्त्यावर जाणार्‍या चारचाकी वाहनाला विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीची ठोकर बसली. त्यानंतर दोघांत बाचाबाची सुरू झाल्यामुळे गर्दी जमली. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी कारचालकाने आपल्या जवळील पिस्तुलातून जमिनीवर गोळीबार केला. या गडबडीत दगडफेक होऊन एका व्यक्तीला किरकोळ जखमही झाली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यावेळी गोळीबार केलेल्या इसमास पोलिसांनी अटक करून नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.