राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद नाही. तर, नों न केलल्या आणखी ९४ कोरोना बळींची नोंद आता सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३४८२ एवढी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४४८ एवढी झाली आहे. ऑगस्ट २०२० ते जून २०२१ या काळातील लपविण्यात आलेल्या कोरोना बळींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या ३३८८ वरून ३४८२ एवढी झाली आहे.
राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २४ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८१ टक्के एवढे खाली आले आहे. गेल्या चोवीस तासांत ३०३८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी कोविडमुळे मृत्यू आलेल्यांच्या नातेवाईकांकडून ५० हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज तथा दावे सादर करण्याचे आवाहन केले आहे.