जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा मुख्यालयात पहिल्या मजल्यावर जिल्हाधिकारी इमारत पणजी गोवा येथे नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. १४ जानेवारीपासून कक्ष सुरू करण्यात आला असून संपर्क क्रमांक ०८३२-२२२५०८३ आणि टोल फ्री क्रमांक १०७७ असा आहे. लोकांच्या तक्रारी असल्यास वरील सदस्यांकडे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.