सरकारने नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करण्याचा निर्णय घेतला असल्याने सध्या छपाई बंद असलेल्या एक रुपयाची नोट पुन्हा आपल्या हाती येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे. अर्थ मंत्रालयाने कॉयनेज ऍक्ट २०११ मध्ये बदल केला असल्याने एक जानेवारीपासून नवीन एक रुपयांची नोट छापण्याचा सरकारला अधिकार मिळाला आहे. ही नोट गुलाबी आणि हिरव्या रंगात असणार असून त्यावर रुपयाचे नवीन चिन्हही असेल. यावर वित्त सचिव राजीव महर्षी यांचे स्वाक्षरी असेल.