कदंब कामगार संघटनेकडून थकबाकी व बोनसची मागणी

0
89

कदंब कामगार संघटनेने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना काल पाठवलेल्या एका निवेदनातून कामगारांचे सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे तीन हप्ते तसेच गेल्या सहा वर्षांचा बोनस नाताळ सणापूर्वी देण्याची मागणी केली आहे. कदंबचे चेअरमन आमदार कार्लूस आल्मेदा यांनी १५ जुलै २०१४ रोजी घेतलेल्या बैठकीत सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे तीन हप्ते तसेच सहा वर्षांचा बोनस या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या सरकारपुढे ठेवण्याचे मान्य केले होते. तसेच गणेश चतुर्थीपूर्वी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. कदंब कामगारांना मासिक वेतन उशिरा मिळत असून ते दर महिन्याला ७ रोजी तरी दिले जावे अशी मागणीही करण्यात आली आहे.