राज्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने 859 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. या शिक्षक भरतीसाठी 26 ते 30 मे दरम्यान पर्वरी येथे जिल्हा शिक्षण कार्यालयात थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. समग्र शिक्षा विभागाच्या शिक्षक भरतीच्या नियुक्त्या पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने असतील. तसेच, त्या 31 मार्च 2026 पर्यंत वैध असणार आहेत. शिक्षकांना मासिक वेतन 20,000 रुपये दिले जाणार आहे. या कंत्राटी भरतीमध्ये 700 प्राथमिक शिक्षक पदे, 30 कला प्रशिक्षक पदे – ज्यामध्ये पाश्चात्य संगीतासाठी 9, ललित कलांसाठी 12 आणि नाट्य कलांसाठी 9 आणि 129 एनएफयूईएफ पदांचा समावेश आहे.

