6 रिक्त जागांसाठी मार्चमध्ये निवडणूक

0
10

राज्यातील सहा ग्रामपंचायतींच्या रिक्त सहा जागांसाठी मार्चमध्ये पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. डिचोली तालुक्यातील वेळगे पंचायतीमधील प्रभाग 5, वन म्हावळिंगे कुडचिरे पंचायतीमधील प्रभाग 6, सासष्टी तालुक्यातील ओर्ली पंचायतीच्या प्रभाग 6, सांगे तालुक्यातील काले पंचायतीच्या प्रभाग 2, केपे तालुक्यातील बाळ्ळी पंचायतीच्या प्रभाग 4 आणि बार्से पंचायतीच्या प्रभाग 7 मध्ये पोटनिवडणूक घेतली जाणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त डब्लू. व्ही. रमणमूर्ती यांनी जाहीर केले आहे. आयोगाने या सहा पंचायत क्षेत्रातील पोटनिवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी आणि साहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तालुका मामलेदार निर्वाचन अधिकारी आणि अव्वल कारकून यांची साहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.