6 प्रभागांसाठी राखीवता जाहीर

0
10

राज्यातील 6 ग्रामपंचायतींच्या 6 प्रभागांमध्ये येत्या 25 मार्च रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रभाग राखीवता जाहीर करण्यात आली आहे. सांगे तालुक्यातील काले पंचायतीचा प्रभाग 2 – ओबीसी, केपे तालुक्यातील बार्से पंचायतीचा प्रभाग 7 – एसटी आणि डिचोली तालुक्यातील वन म्हावळींगे पंचायतीचा प्रभाग 6 – ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर, केप्यातील बाळ्ळी पंचायतीचा प्रभाग 4, डिचोलीतील वेळगे पंचायतीचा प्रभाग 5 आणि सासष्टीतील ओर्ली पंचायतीचा प्रभाग 6 सर्वसाधारण गटासाठी खुला आहे.