एका युवतीने अनेकांना सुमारे 47 लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून पर्वरी पोलिसांनी युवतीला अटक केली आहे. निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दि.30 जूनपूर्वी हरमल (पेडणे) येथील काजल सुभाष नानोस्कर (25) हिने तक्रारदार संतोष वळवईकर याला राज्यात भूखंड आणि सदनिका देण्याचे खोटे आमिष दाखवून सुमारे 47 लाख रुपयांचा गंडा घातला. काजल हिने संतोष आणि इतर लोकांना या व्यवहारात फसवले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून तिच्यावर भा. न्या. सं. 318(3) या कालमाखाली गुन्हा नोंदवला आहे. निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विघ्नेश नाईक पुढील तपास करीत आहेत.

