4 फेब्रुवारीपर्यंत ‘सेंट झेव्हियर्स’मध्ये विद्यार्थी मंडळ स्थापनेचा उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

0
2

म्हापशाचे उपजिल्हाधिकारी व उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी म्हापसा येथील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला 4 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्याचा काल आदेश दिला. त्यासंबंधी 28 जानेवारीपर्यंत काय तो निर्णय घ्यावा, अशी सूचनाही उपजिल्हाधिकाऱ्यांनी सदर महाविद्यालयाला केली आहे.
काल या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या प्रशासनाची एक बैठक घेण्यात आली. यावेळी महाविद्यालय प्रशासनाला सदर आदेश देण्यात आला. महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाची स्थापना न केल्याच्या विषयावरुन 21 जानेवारी रोजी अभाविपने सेंट झेवियर्स महाविद्यालयात वर्ग चालू असताना मोठा गोंधळ घातल्याने वाद निर्माण झाला होता.

एनएसयूआय या काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने अभाविपने सेंट झेवियर्समध्ये घातलेल्या गोंधळाचा निषेध केला होता. सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची उच्च शिक्षण संचालनालयामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट
केले होते.