4 दिवस घट; पुन्हा कोरोना रुग्णांत वाढ

0
14

>> 24 तासांत 10 हजार 542 नवे रुग्ण, 38 बळी

देशात सलग चार दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा गेल्या 24 तासात रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 10 हजार 542 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 38 जणांचा मृत्यू झाला. या वर्षातील मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याचवेळी सक्रिय रुग्णांची संख्या 63 हजार 562 वर पोहोचली आहे

यावर्षी 13 एप्रिल रोजी सर्वाधिक 11 हजार 109 रुग्ण सापडले होते. त्यानंतर सलग चार दिवस संसर्गामध्ये घट झाली होती. मंगळवारी 7 हजार 633 रुग्ण, सोमवारी नवे 9 हजार 111 रुग्ण, रविवारी 10,093 आणि शनिवारी 10,753 नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत असल्योन दिलासा मिळाला होता; मात्र काल पुन्हा एकदा कोरोनाबाधितांत वाढ झाल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 10,542 नवीन कोरोना रुग्ण आढळले, त्यापैकी 6,310 रुग्ण एकट्या 5 राज्यांमध्ये आढळून आले.
केरळमध्ये 2,041 नवीन रुग्ण आढळले, तर 2,062 रुग्ण बरे झाले. दिल्लीते 1,537 नवीन प्रकरणे समोर आली. दिल्लीतील संक्रमण दर 26.54 टक्क्यांच्या वर गेला असून, गेल्या 24 तासांत 5 जणांचा मृत्यू झाला. हरियाणात 965 नवीन रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 949 नवीन रुग्ण आढळले, तर उत्तर प्रदेशात 818 नवीन प्रकरणे समोर आली.