24 तासांत 6.30 इंच पाऊस

0
8

>> आजही मुसळधार पाऊस शक्य; ऑरेंज अलर्ट जारी

राज्यभरात पावसाचा जोर कायम असून, काल अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली. गेल्या चोवीस तासांत एकूण 6.30 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 79.23 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण 41 टक्के जास्त आहे. येथील हवामान विभागाने राज्यात मंगळवार दि. 16 जुलैला पावसाची शक्यता व्यक्त केली असून, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यात मागील चोवीस तासांत पेडणे, केपे, म्हापसा, फोंडा, साखळी, वाळपई, काणकोण, पणजी आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या भागात रस्त्यावर पाणी साचल्याने गैरसोय झाली.

चोवीस तासांत पेडणे येथे सर्वाधिक 7.80 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे 7.48 इंच, म्हापसा येथे 7.20 इंच, फोंडा येथे 6.01 इंच, पणजी येथे 5.63 इंच, जुने गोवे येथे 5.19 इंच, साखळी येथे 6.76 इंच, वाळपई येथे 6.96 इंच, काणकोण येथे 6.40 इंच, दाबोळी येथे 4.10 इंच, मुरगाव येथे 4.23 इंच, मडगाव येथे 5.16 इंच, सांगे येथे 6.31 इंच पावसाची नोंद झाली.
राज्यभरात झाडांची पडझड सुरूच आहे. राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखी 125 घटनांची नोंद झाली. या पडझडीमुळे सुमारे 8 लाख 91 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने सुमारे 32 कोटी 15 हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. झाडांच्या पडझडीमुळे वीज खात्याचेही नुकसान झाले.
राज्यातील वाळपई येथे सर्वांधिक 87 इंच पावसाची नोंद झाली असून, इंचाच्या नव्वदीकडे वाटचाल सुरू आहे. सांगे, साखळी, काणकोण या भागात सुध्दा मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 41 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.