24 तासांत सापडलेानवे 87 कोरोनाबाधित

0
6

राज्यात चोवीस तासांत नवीन कोरोनाबाधिताच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, नवीन 87 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच नव्या रुग्णांपैकी आणखी 5 जणांना इस्पितळात दाखल करावे लागले. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या तीनशेच्या जवळ येऊन ठेपली असून, ती 290 एवढी झाली आहे.

राज्यात मागील चोवीस तासांत 878 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात विक्रमी 87 कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडले. मार्च महिन्यात कोरोना संसर्गात पुन्हा वाढ होऊ लागल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवसांत रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 9.9 टक्के एवढे आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांकडून अजूनपर्यंत मास्कचा वापर होताना दिसत नाही.