24 तासांत राज्यात 2.40 इंच पाऊस

0
10

राज्यात मागील तीन दिवस जोरदार पडणाऱ्या पावसाने काल थोडी उसंत घेतल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुस्कारा सोडला. चोवीस तासांत 2.40 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 124.11 इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत राज्यभरात 14 ठिकाणी पूर आला होता. अग्निशामक दलाने पुरात अडकलेल्या एकूण 53 जणांची सुटका केली. त्यात 30 व्यक्ती आणि 23 जनावरांचा समावेश आहे. तसेच, झाडांच्या पडझडीच्या आणखी 50 घटनांची नोंद झाली आहे. या पडझडीमुळे सुमारे 1 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.