23 शॅक बंद करा; पर्यटन खात्याचा आदेश

0
2

पर्यटन खात्याने गोवा राज्य शॅक धोरण 2023-26 चे उल्लंघन करणारे 23 शॅक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. या 23 शॅकपैकी 6 शॅक परप्रांतीय चालवत होते. पर्यटन खात्याने शॅक धोरणाच्या उल्लंघन प्रकरणी एकूण 110 शॅकचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी 54 शॅकचालकांची चौकशी पूर्ण केली होती. त्यातील 23 शॅकनी उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. तर 31 जणांनी उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट झाले. आणखी 56 शॅकच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.