गोवा कर्मचारी भरती आयोगाने राज्य सरकारच्या विविध खात्यांत 219 पदांच्या भरतीसाठी काल जाहिरात जारी केली. आयोगाने जाहीर केलेल्या विविध पदांसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर केले जाऊ शकतात. आयोगाने 2025 मध्ये जाहीर केलेली ही सरकारी नोकरभरतीची तिसरी जाहिरात आहे.
या भरतीमध्ये शिक्षण विभागात प्रयोगशाळा साहाय्यकांच्या 46 जागा, नियोजन-सांख्यिकी खात्यात अन्वेषकाच्या 27 जागा, दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयात मिळून तलाठ्यांच्या एकूण 30 जागा, पंचायत संचालनालयात पंचायत सचिवांच्या 26 जागांचा समावेश आहे.
कर्मचारी भरती आयोगाच्या संकेतस्थळावर सरकारच्या विविध खात्यातील एकूण 219 पदांच्या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पोलीस खात्यात शोधक 1 जागा भरली जाणार आहे. मच्छीमारी खात्यात साहाय्यक अधीक्षकांची 1 जागा, वजन आणि माप खात्यात निरीक्षकाची 1 जागा, खाण खात्यात कनिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञाच्या 7 जागा, सार्वजनिक बांधकाम खात्यात साहाय्यक रसायनशास्त्राच्या 3 जागा, संग्रहण खात्यात साहाय्यक अभिलेखशास्त्राच्या 2 जागा भरण्यात येणार आहेत.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकुनाच्या 12 जागा, पर्यटन खात्यात माहिती साहाय्यकाच्या 6 जागा, उद्योग खात्यात उद्योग निरीक्षकाची 1 जागा, नागरी पुरवठा विभागात निरीक्षकांच्या 5 जागा, शिक्षण खात्यात प्रयोगशाळा साहाय्यकांच्या 46 जागा भरण्यात येणार आहेत. त्यात उच्च शिक्षण, शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि कंपनी आणि बाष्पक विभागातील जागांचा समावेश आहे.
संग्रहण खात्यात प्रयोगशाळा साहाय्यक 1 जागा, पोलीस खात्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 जागा, कंपनी आणि बाष्पक खात्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 1 जागा, शिक्षण खात्यात स्टोअर किपरच्या 4 जागा भरण्यात येणार आहेत.
नियोजन-सांख्यिकी खात्यात अन्वेषकांच्या 27 जागा भरण्यात येणार आहेत. लेखा खात्यात ट्रेजरी ग्रेड 3 च्या 9 जागा, अकाउंट क्लर्कच्या 12 जागा, कृषी खात्यात कनिष्ठ संशोधक साहाय्यकाच्या 2 जागा भरण्यात येणार आहेत.
पंचायत खात्यामध्ये पंचायत सचिवांच्या 26 जागा, पशुसंवर्धन खात्यात प्रयोगशाळा साहाय्यकाची 1 जागा, दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठ्यांच्या एकूण 30 जागा आणि मच्छिमारी खात्यात सर्वेक्षकांच्या 2 जागा भरण्यात येणार आहे. जाहीर केलेल्या पदांपैकी काही पदे राखीव आहेत. या पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज सादर करण्यात आल्यानंतर उमेदवारांची सीबीटी परीक्षा घेतली जाणार आहे.