2020 पासून राज्यात गोळीबाराच्या 7 घटना ः काँग्रेस

0
9

गेल्या शुक्रवारी पर्वरी येथे झालेली गोळीबाराची घटना ही गेल्या सात वर्षांतील राज्यातील पहिलीच घटना आहे, असा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला दावा हा खोटा असून 2020 ते 26 या काळात राज्यात गोळीबाराच्या तब्बल सात घटना घडल्या असल्याचे काल काँग्रेसने स्पष्ट केले. पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडून माहिती हक्क कायद्याखाली गेल्या आठ वर्षांच्या काळात राज्यात गोळीबाराच्या किती घटना घडल्या त्याची तपशीलवार माहिती मिळवण्यात येणार असल्याचेही काल काँग्रेसने स्पष्ट केले.
काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे गेल्या शुक्रवारी झालेली गोळीबाराची घटना ही गेल्या आठ वर्षांत राज्यात झालेली पहिलीच घटना असल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले.

पर्वरीतील 7वी घटना
यासंबंधी सविस्तर माहिती देताना पणजीकर यांनी, 2020 साली सांताक्रुझ येथे गोळीबाराची घटना घडली होती. तद्नंतर पुढील वर्षी म्हणजे 2021 साली फातोर्डा, अंबाजी जंक्शनजवळ गोळीबार झाला होता. शिवोली रेस्टॉरंन्टमध्ये 2023 तर 2024 साली बेतोडा येथे शूट आऊट झाले. 2025 साली राज्यात गोळीबाराच्या दोन घटनाघडल्या. त्यापैकी एक घटना ही मुंगूल, मडगाव येथे कोलवा मार्गावर शूट आऊट झाले. तर याच वर्षाची दुसरी घटना ही पेडणे न्हयबाग येथे झाली. आता 2026 सालची गोळीबाराची घटना ही गेल्या शुक्रवारी पर्वरी येथे मॅजिस्टिक प्राईड येथे झाल्याचे सांगितले.