2 कोटींच्या अमलीपदार्थांचीगोवा पोलिसांकडून विल्हेवाट

0
14

गोवा पोलिसांनी 18 अमलीपदार्थ प्रकरणामध्ये जप्त केलेले अंदाजे 2 कोटी 2 लाख 35 हजार रुपयांच्या सुमारे 46.363 किलो अमलीपदार्थांची विल्हेवाट काल कुंडई येथील जैविक कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या भट्टीत लावण्यात आली. अमलीपदार्थ प्रकरणाच्या नोंदींची योग्य पडताळणी आणि विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, जप्त केलेले अंदाजे 2 कोटी 2 लाख 35 हजार रुपये मूल्य असलेल्या 46.363 किलो अमली पदार्थ कुंडई येथील जैविक कचरा विल्हेवाट प्रकल्पातील भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आले. यावेळी पोलीस महासंचालक आलोक कुमार, गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विल्हेवाट समितीचे अध्यक्ष, पोलीस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्य, पोलीस अधीक्षक सुनीता सावंत, एफडीएच्या संचालिका स्वेता देसाई, अमलीपदार्थ विरोधी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्याची उपस्थिती होती.