1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष

0
17

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची न्यायालयाने काल निर्दोष मुक्तता केली. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला. मात्र टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

1993 मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या काही ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करिब टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे.

सीबीआयने टुंडाला या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मानले होते आणि त्याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत.