संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) चे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर काल आपले आमरण उपोषण सोडले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी डल्लेवाल यांनी 26 नोव्हेंबर 2024 पासून उपोषण सुरू केले होते. रविवारी फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात झालेल्या किसान महापंचायतमध्ये त्यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी एक दिवस आधी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डल्लेवाल यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते आणि 4 मे रोजी चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत त्यांचा लढा सुरूच राहील, असे शेतकऱ्यांच्या महापंचायतीला संबोधित करताना डल्लेवाल यांनी सांगितले

