10 लाखांचा ऐवजबंगल्यातून लंपास

0
2

कदंब पठारावरील एका बंगल्यामध्ये रविवारी मध्यरात्री चोरीची एक घटना घडली असून, चोरट्यांनी आठ ते दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत प्रवेश करून चोरी केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित तिघेजण बंगल्यात प्रवेश करीत असल्याचे दिसून येत आहे. या चोरी प्रकरणी राजीव आगरवाल यांनी जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास केला जात आहे.