९ कोटींना गंडा घालणार्‍या संशयितास गुजरातेत अटक

0
12

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने सुमारे अडीच हजार नागरिकांना ९.३३ कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या संशयित आरोपी जयकुमार गोहील याला वापी-गुजरात येथे अटक करून गोव्यात आणले आहे.

आर्थिक गुन्हा शाखेने गुजरात पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. मडगाव येथील आस्थापनेतून संशयित जयकुमार गोहील आर्थिक व्यवहार करीत होता. जयकुमार याने पाच जणांच्या साहाय्याने सुमारे २५०० गुंतवणूकदारांना जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गंडा घातला होता. त्याने गुंतवणूकदारांना जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून १५ जुलै २०२१ पासून मडगाव येथे गुंतवणुकीसाठी रक्कम स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुंतवणूकदाराकडून जमा केलेल्या ९.३३ कोटीच्या रक्कमेसह पोबारा केला होता.