‘३७० रद्दनंतर’ शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ९५० घटना

0
125

केंद्रातील मोदी सरकारने घटनेतील कलम ३७० रद्द केल्यापासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ९५० घटना घडल्या असल्याची माहिती काल लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी याविषयी माहिती दिली. पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील प्रदेशांमधून भारतीय हद्दीत केल्या जाणार्‍या दहशतवादी कारवाया हा अजूनही उभय देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चिंतेचा विषय राहिला आहे असे रेड्डी यावेळी म्हणाले.

लोकसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या ऑगस्ट महिन्यात कलम ३७० रद्द करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानकडून ९५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले होते.