२० दिवसांत १६० मृत्यू, ११ हजार बाधित

0
116

>> रविवारी ९ बळी, ४०७ नवे रुग्ण

>> सप्टेंबर महिन्यात ८७२० कोरोनामुक्त

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह ११,०११ रुग्ण आढळून आले असून १६० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच काळात ८७२० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, रविवारी नवे कोरोना पॉझिटिव्ह ४०७ रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८४२९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५७८१ एवढी झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात गत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात नवे ११,५०५ रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबरच्या पहिल्या २० दिवसांत अकरा हजार नवे रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह १४७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत ऑगस्ट महिन्यात ९३६६ कोरोना रुग्ण बरे झाले होते.

आणखी ९ जणांचा बळी
राज्यात आणखी ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ८ रुग्णांचा आणि मडगाव येथील कोविड इस्पितळात १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नऊपैकी दोन रुग्णांचा मृत्यू त्यांना इस्पितळात दाखल केल्यानंतर १२ तासांच्या आतमध्ये झाला आहे. चांदोर येथील महिला रुग्णाचे इस्पितळात दाखल केल्यानंतर तासभरात निधन झाले. तर, आगशी येथील पुरुष रुग्णाचा केवळ १० तासांत मृत्यू झाला आहे. चोडण येथील ४९ वर्षांचा पुरुष, चांदोर येथील ५८ वर्षांची महिला, मंडूर येथील ५६ वर्षांचा पुरुष, आगशी येथील ६२ वर्षांचा पुरुष, वास्को येथील ६५ वर्षांचा पुरुष, वास्को येथील ६५ वर्षांचा पुरुष, असोल्डा केपे येथील ५१ वर्षांचा पुरुष, वाळपई येथील ७३ वर्षांचा पुरुष, थिवी येथील ६८ वर्षांचा पुरुष आणि खारेबांद येथील ८६ वर्षांच्या महिला रुग्णांचे निधन झाले आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत १४११ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४०७ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ३७ हजार १९८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

५३७ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी ५३७ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२२९७ एवढी आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.४३ टक्के एवढे आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २७५ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णाची संख्या १२००७ एवढी झाली आहे. गोमेकॉमध्ये नवीन २२० रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देत असल्याने राज्यातील कोविड केअर सेंटरमधील बर्‍याच खाटा रिक्त आहेत. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये २१७ खाटा आणि दक्षिण गोवा कोविड केअर सेंटरमध्ये ४९३ खाटा रिक्त आहेत.

पणजीत ३४३ रूग्ण
पणजी परिसरात ३४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पणजीतील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे, मुंबईतून चित्रिकरणासाठी आलेले सातजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ते येथील एका हॉटेलमध्ये राहत आहेत.