१ मेपासूनच्या लसीकरणासाठी खासगी इस्पितळात डोस नाहीत

0
121

१८ ते ४५ या वयोगटातील कोरोनासाठीचे लसीकरण परवा १ मेपासून सुरू करण्यात येणार असले तरी अद्याप खासगी इस्पितळात त्यासाठी लशीचे डोस उपलब्ध होऊ शकले नसल्याचे वृत्त आहे.

मंगळवारी आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी पत्रकार परिषदेत त्यासंबंधीची माहिती देताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून लसीचे डोस मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे हे लसीकरण येत्या १ मेपासून सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण सदर प्रश्‍नी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. पुनावाला यांच्याशी बोलणी केली असून त्यांनी आवश्यक तेवढे डोस उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र, हे लसीकरण परवापासून सुरू करण्यात येणार असले तरी अद्याप लसीचे डोस उपलब्ध होऊ न शकल्याने ठरल्यानुसार १ मेपासून लसीकरण सुरू होणे कठीण असल्याचे दिसत आहे.