१५ ते १८ वयोगटाती ९२.५५ टक्के मुलांना लस

0
21

राज्यातील १५ ते १८ वयोगटातील सुमारे ९२.५५ टक्के मुलांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ७७.७० टक्के मुलांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आरोग्य खात्याकडून मागील आठवड्यात या वयोगटातील एकूण ९०५ मुलांना कोविड लसीचा डोस देण्यात आला. राज्यात या वयोगटातील सुमारे ७४ हजार मुलांना कोविड लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील १२ ते १४ वयोगटातील सुमारे ६३.४८ टक्के मुलांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ३५.६१ टक्के मुलांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आरोग्य खात्यातर्फे मागील आठवड्यात १२ ते १४ वयोगटातील ६ हजार ८१७ मुलांना कोविड लसीचा डोस देण्यात आला आहे. या वयोगटातील सुमारे ४८ हजार मुलांना कोविड लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट आहे.